नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक:- गावात सर्व जाती धर्मियांची एकजूट असणे हीच गावाची शान आणि हाच गावाचा अभिमान आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील खंबाळे गावात सर्व जाती धर्मीयांची एकजूट आणि निर्मळ एकोपा पाहून या गावाचा मला अभिमान वाटत आहे.अशीच एकजूट प्रत्येक गावात असली पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
यावेळी नाशिक चे खासदार हेमंत गोडसे; रिपाइं चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर;माजी आमदार राजाभाऊ वाजे; उदय सांगळे; आरपीआय जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे; श्रीकांत भालेराव; शिवाजीराव ढवळे; खंबाळे गावचे सरपंच भाऊसाहेब आंधळे; मंगेश जाधव; चंद्रशेखर कांबळे; अनिल भाई गागुङे सह जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी नागरिक आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
खंबाळे गावात केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसा आई आठवले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य सभामंडपाचे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जाहीर सभेत समस्त खंबाळे ग्रामस्थांच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कर करण्यात आला.
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन च्या टिकीटावर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत लोकसभा निवडणूक लढविली मात्र त्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व जाती धर्मीयांच्या व्यापक पक्षाची संकल्पना मांडली.त्यामुळे संपूर्ण देशात मी रिपब्लिकन पक्ष वाढवीत आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.
Tags
news
