कृष्णा कोळी 9823983435 प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने आज पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत लाक्षणिक उपोषण करून जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील ,एकनाथ पाटील,सुलभा पवार, गिरधर मोरे, योगेश्वर बुवा, प्रभू तडवी ,चेतन इंगळे, शेख इलियास, ताहीर सरदार मंसुरी, सुखदेव देसले, आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी उपोषण करून निवेदन सादर केले.
दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी राज्यभर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमाने पत्रकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र शासनापर्यंत निवेदन देण्यात आले होते. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया संघापर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे आज राज्यभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आमच्या मागण्या पुढील दोन महिन्यात मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यभर पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने पत्रकारांना प्राधान्याने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करावी, पत्रकारांना प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी, कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन शासनाच्या वतीने बांधून देण्यात यावे, तालुका जिल्हा व प्रदेश कार्यकारणीतील पत्रकारांचा पदाधिकाऱ्यांना शासकीय समित्यांमध्ये समाविष्ट करावा, वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहत निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे, शासकीय विश्रामगृहाच्या पत्रकारांना मोफत लाभ मिळावा, नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्ट संचलित एस ए. मिशन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुलभा पवार यांना न्याय मिळावा, पत्रकारांना मोफत आरोग्य विमा व अपघात विमा संरक्षण मिळावे, राज्यातील शासकीय भूखंड पत्रकार बहुउद्देशीय संघांना सामाजिक उपक्रमासाठी देण्यात यावे. यासह 14 ठळक मागण्यांचे निवेदन आज नंंदुुुुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील ,एकनाथ पाटील,सुलभा पवार, गिरधर मोरे, योगेश्वर बुवा, प्रभू तडवी ,चेतन इंगळे, शेख इलियास, ताहीर सरदार मंसुरी, सुखदेव देसले, आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी उपोषण करून निवेदन सादर केले.
