शिरपूर - किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ. विजयराव रंधे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरपूर येथे डॉ विजयराव रंधे यांच्या जयंती निमित्ताने गणितीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. डॉ. रंधे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण खजिनदार आदरणीय आशा ताई रंधे यांच्या शुभहस्ते समन्वयक जी व्ही पाटील, जी ओ पाटील,सुमिता गवळी,हर्षाली रंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.ऑनलाइन गणित वेबिनार चे उद्घाटन प्रा.प्रकाश बारी यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पुणे येथील गणित विषय तज्ञ रवि वरे यांनी गणितातील मूलभूत संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट करून दिल्या व गणितातील कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने शिकवल्या चुका आणि शिका ही पद्धत गणित अध्ययन अध्यापनातून खूप खूप उपयुक्त आहे असे ही त्यांनी उदाहरणादाखल स्पष्ट केले. या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला व आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. या प्रसंगी प्राचार्य कामिनी पाटील, सारिका ततार,गणित विभाग प्रमुख महेश राजपूत, वंदना पांडे, मनीषा लोखंडे, उमेश राजपूत, रामकांती विश्वकर्मा आदी शिक्षक उपस्तीत होते. तर गणित कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पाटील, समाधान राजपूत शगुफ्ता मन्सुरी यांनी प्रयत्न केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सोनगडे सर यांनी केले.
Tags
news
