नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक-:मनमाड येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा , अध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्रामध्ये गुरू माऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने ग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठक संपन्न झाली.
या बैठकीच्या निमित्ताने गुरू माऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचे मनमाड केंद्रात आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी गेल्या एक आठवड्या पासुन केंद्रामध्ये सेवेकऱ्यांकडुन तयारी चालु होती.केंद्रा मधिल श्री स्वामी समर्थांचा दरबार हा सुंदर अशा फुलांनी सजवून केंद्राचा परिसर हा आकर्षक अशा विद्युत रोषणाईने , रांगोळी , मंडप आणि स्वागत कमानी द्वारे सजवण्यात आलेला होता.भारतीय संस्कृतीचे पारंपरिक सण असणारे गुढीपाडवा , पोळा या सणा सोबत घरातील देव्हारा कसा असावा , पारंपरिक शेती व्यवसाय यांचे देखावे बनवण्यात आलेले होते.गुरूमाऊलींच्या आगमना नंतर केंद्रातील महिला सेवेकऱ्यांकडुन त्यांचे अवक्षण करण्यात आले , मनमाड स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या केंद्र प्रामुखांकडुन श्री गुरुमाऊलिंचे स्वागत करण्यात आले.
उपस्थित सेवेकर्यांना गुरू माऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या कडुन अनेक धार्मिक , वैज्ञानीक ,नैसर्गीक , सामाजिक , केंद्राद्वारे चालवण्यात येणारे विविध उपक्रम आणि त्या विषयांच्या समबंधीत काम करणाऱ्या समित्या अशा अनेक विषयांवर गुरुमाऊलींकडुन सेवेकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या ग्राम अभियान प्रतिनिधी प्रशासकीय बैठकीस नाशिक , मालेगांव , नांदगाव आणि मनमाड केंद्रातील सेवेकरी उपस्थित होते.
Tags
news
