वेल्हाणे येथे युवा दिन प्रतिमा पूजन करून साजरी....




धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद जी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे संयुक्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सदर प्रतिमापूजन विवेक उद्योग संकुल शॉपिंग मध्ये करण्यात आले.सालाबादाप्रमाणे दरवर्षी गावात शोभायात्रा व व्याख्यान आयोजित करण्यात येत होती पण यंदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फक्त प्रतिमा पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी विवेकानंद युवक बचत गटाचे अध्यक्ष आनंदा मराठे संस्थेचे उपाध्यक्ष अनिल शिंदे सचिव प्रवीण बोरसे सहसचिव अविनाश वाघ कैलास माळी प्रवीण मराठे आनंद सोनवणे आदी उपस्थित होते...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने