शिरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यात पोलीस दलातर्फे 2 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत रेझिंग डे साजरा केला जातो. यादरम्यान विविध उपक्रम राबवले जातात यात विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज कसे चालते त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे, पोलिस दलाकडे असलेल्या विविध हत्यारांचे प्रात्यक्षिक दाखवणे ,पोलिसांचे वायरलेस द्वारे कसे कामकाज चालते इत्यादीबाबत विद्यार्थी व नागरिकांना जागृत करून पोलिसांबद्दल ची मनातील भीती दूर करून पोलीस कशा पद्धतीने गुन्ह्यांचा तपास करून नागरिकांना न्याय देतात याबाबत जनजागृती केली जाते.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनला आज दिनांक 8 जानेवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर यांच्या उपविभागातील शिरपूर शहर पोलीस स्टेशन ,सांगवी पोलीस स्टेशन ,थाळनेर पोलीस स्टेशन ,शिंदखेडा पोलीस स्टेशन, दोंडाईचा पोलीस स्टेशन या सर्व उपविभागातील पोलिसांनी रेझिंग डे सप्ताहात नागरिकांच्या आलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल आज मूळ फिर्याद दार यांना परत करण्यात आला. यात विविध सोन्याचे दागिने ,चांदीचे दागिने मोबाईल फोन व मोटरसायकल यांचा समावेश होता.
या सप्ताह शिरपूर शहर पोलीस स्टेशन ने विविध कारवाईत जप्त केलेले सोन्याचे दागिने, सांगवी पोलीस स्टेशन यांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेले चांदीचे दागिने व 4 मोटर सायकल ,थाळनेर पोलीस स्टेशन यांनी जप्त केलेल्या 7 मोटर सायकल, शिंदखेडा पोलीस स्टेशन यांनी जप्त केलेली 1 मोटार सायकल यावेळेस मूळ फिर्याद दार यांना परत करण्यात आले. आपला चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाला म्हणून फिर्यादी यांच्या चेहर्यावरील आनंद द्विगुणित होत होता. म्हणून त्यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले पोलिसांना देखील त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदमयी भाव पाहून अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली. यावेळेस सदर कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील ,सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे ,शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व या गुन्ह्यासंदर्भात तपास काम करून गुन्ह्याचा शोध लावणारे पोलिस कर्मचारी व विविध फिर्याद दार उपस्थित होते.
Tags
news
