माहेराहून नाशिककडे येण्यासाठी निघालेल्या आई व मुलींचा दुदैऀवी अंत, त्यांचा मृतदेह पंचवटी गोदापात्रात आढळल्याने एकच खळबळ .

            



 ‌नाशिक प्रतिनिधी  शांताराम दुनबळे                                  ‌नाशिक - दोघी मायलेकी चार जानेवारी रोजी नांदूर शिंगोटे येथून बेपत्ता झाल्याची फिर्याद वावी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तेंव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. सोशल मीडियावर त्यांचा फोटोही व्हायरल केला गेला होता. त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. म्हऱ्हळ येथील माहेराहून नाशिककडे येण्यासाठी निघालेल्या ज्योती योगेश राठी (वय २५ आणि त्यांची मुलगी जिया (वय 3 वर्षे) चार तारखेला नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील बसस्थानकावरून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा मृतदेह गोदापात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.सात तारखेला ज्योती राठी यांचा मृतदेह नाशिक येथील रामवाडी पूलाजवळ गोदापात्रात तरंगताना आढळला होता. मात्र त्यावेळी मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यानंतर १४ तारखेला चिमुरडी जियाचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. दोन्हीही मृतदेह आढळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने