होळ ग्रामपंचायत निवडणूक रंगात, संपूर्ण विकास पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात सामना




महेंद्र सिंह राजपूत संपादक

 शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत होळ ही नावाजलेली ग्रामपंचायत. तालुक्यातील अग्रगण्य  ग्रामपंचायतीच्या  यादीत समावेश होत असतो. यापूर्वी ग्रामपंचायतीने  ने नामांकित कामगिरी करून आपला ठसा उमटवला होता. या ग्रामपंचायतीला यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत ग्राम ,निर्मल ग्राम, सानेगुरुजी स्वच्छ शाळा ज्ञान योगिनी पुरस्कार, प्राथमिक आरोग्य केंद्र आळंदी बाई जोशी पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार, ग्रामस्वच्छता अभियानात नाशिक विभागात तृतीय क्रमांक, आदर्श शाळा ,आदर्श खेडे ,आदर्श दलित वस्ती,  गुरुकुल  आश्रम पुरस्कार ,विको विलेज , तंटामुक्त अभियान, गौरव ग्रामसभा पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित अशीही ग्रामपंचायत आहे .
मात्र कालांतराने ग्रामपंचायतीची विकास गाथा कमी होऊन पंचायत कारभारात नवनवीन भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या सुरस कथा बाहेर यायला लागल्या या काळात ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप नोंदवलेले व पंचायतीच्या कारभारात मनमानी कारभार केल्याचे आरोप देखील लावण्यात आले .त्यामुळे यापूर्वी केलेले भरीव काम व मिळालेले पुरस्कार हे फक्त सोपस्कार होते की राजकीय आशीर्वाद याबाबत आता शंका उपस्थित होत आहे.
 या पूर्वी ग्रामपंचायतीवर कारभार करणारी संपूर्ण पिढी आता अनंतात विलीन झाली असून गावातील नवयुवक यांच्या कडे आता या ग्रामपंचायतीच्या कारभार सोपवला जाणार आहे . मात्र दोन्ही पॅनल कडून विकासाच्या आणाभाका घेतल्या जात असून पुढील काळात आम्ही गावाच्या सर्वांगीण विकास करणार आहोत अशा प्रकारची प्रचार मोहीम राबवली जात आहे ती जरी काळाची गरज असली तरी मागील काळात  ग्रामपंचायतीचा  कारभाराबाबत अनेक मुद्दे चव्हाट्यावर आले होते. या गावातील बेकायदेशीर शॉपिंग सेंटर, त्यातून दिलेला बेकायदेशीर लाभ व आपल्या बगलबच्चे यांनी राजकीय समर्थकांनी त्याच्या घेतलेला उपभोग हे चर्चेचे विषय होते. याशिवाय राजकीय समर्थकांना  भूखंडाच्या श्रीखंड चे वाटप ,शासकीय जमिनीवर उभारलेले घरे दुकाने शॉपिंग सेंटर, त्यांचा दिलेल्या जागांचा बेकायदा वापर, विकासाच्या नावाखाली झालेले भ्रष्टाचाराचे बाजार ओटे,व खोटी कामे, विशिष्ट समाज वर्गाला खूष करण्यासाठी दिलेल्या जमिनी इत्यादी विषय चर्चेत होते . या शिवाय
या गावात माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचे काय झाले व त्यावर कोणतीही कार्यवाही का झाली नाही युवा या प्रकरणातून काही राजकीय स्वार्थ साधला नाही गेला ना या सर्व प्रश्नांची उत्तरे आज देखील अनिर्णीत आहेत. आता हे सगळे मुद्दे प्रचाराच्या ओघात मागे पडले असून सत्तेवर येण्यासाठी दोन्ही पॅनलचे राजकीय चढाओढ सुरू आहे

  मात्र भविष्यात पुन्हा असा गैरप्रकार होऊ नये व सरकारी जागांच्या राजकीय हितासाठी व वैयक्तिक स्वार्थासाठी वापर होऊ नये यासाठी नागरिकांनी आजच जागृत होण्याची गरज आहे. येणारी तरुण पिढी ग्रामपंचायतीच्या  राज कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर पूर्वीचा राज्यकर्त्यांचे पाप असेच झाकून ठेवणार आहे की नवीन काही आदर्श निर्माण करणार आहे? याबाबत देखील जाब विचारण्याची वेळ आता मतदारांना आली आहे .
 असे म्हणतात की राजकारणाची समीकरणे पावलोपावली बदलत असतात असेच काही होळ च्या निवडणुकीत दिसत आहे .यापूर्वीचे विरोधक व  समर्थक आता दोन पार्टीत विभागले गेले असून एकमेकांच्या समोर संपूर्ण विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून निवडणूक लढवत असून सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने