आर. सी. पटेल उर्दू विभागाचे दोघा मुख्याध्यापकांना पीएच. डी. पदवी प्रदान



शिरपूर : येथील आर. सी. पटेल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मुबीनोद्दीन शेख व मुख्याध्यापक सैय्यद इफ्तेखार अहमद यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील उर्दू विभागा अंतर्गत डाॅक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

'डाॅ. कालिदास गुप्ता की अदबी खिदमात' हा मुबीन शेख यांचा तर 'उर्दू तंकीद निगारी मे प्रो. गोपीचंद नारंग का मकाम व मरतबा' हा सै. इफ्तेखार अहमद  यांचा संशोधनाचा विषय होता.
संस्थेचे संस्थापक माजी शिक्षणमंत्री आ. अमरीशभाई पटेल, अध्यक्ष भुपेशभाई पटेल, कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी संस्थेच्या सर्व शिक्षकांना आपली शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता वाढविण्यास प्रेरित केले होते. वरिष्ठांच्या या  पाठबळामुळे  दोघांना प्रोत्साहन मिळाले.याकामी त्यांना वसंतराव नाईक इंस्टिट्यूट, नागपूरचे डाॅ. फिरोज हैदरी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक पदावर काम करीत असताना त्यांनी वेळेचा अभाव आणि इतर अनेक अडचणींवर मात करून आपले संशोधन पूर्ण केले आहे.

दोघांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचे हस्ते व डॉ. साजिद अली कादरी उर्दू विभाग प्रमुख, अमोल सोनवणे, लोहार सर, अतीक खान सर या मान्यवरांच्या उपस्थितीत नोटिफीकेशन प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे आ. अमरीशभाई पटेल,  भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, हाजी फिरोज काजी, डॉ. उमेश शर्मा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने