शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात 34 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यातून 6 ग्रामपंचायती व काही ग्रामपंचायतील अनेक सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरित 28 ग्रामपंचायतींची व निवडणूक लागलेल्या उमेदवाराची निवडणूक प्रक्रिया काल दिनांक 15 जानेवारी रोजी पार पाडण्यात आली. या निवडणुकीत एकूण 52,154 मतदार आपल्या निवडणुकीच्या हक्क बजावणार होते. त्यात 25 , 528 महिला व 26,626 पुरुष मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यातून 39, 823 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये 10,025 महिला मतदान तर 20,198 पुरुषांचे मतदान झाले आहे. शिरपूर तालुक्यातून एकूण सरासरी 76 . 36 इतके मतदान झाले असून अनेक उमेदवारांची राजकीय भविष्य मतपेटीत बंद झाले असून त्याच्या निकाल 18 जानेवारी रोजी लागणार आहे.
तोपर्यंत तालुक्यात विविध राजकीय अंदाज आकडेवारीच्या आधारे मतदानाच्या यावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. मात्र अंतिम सत्य निकालानंतर समोर येणार आहे .या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती त्यासाठी महसूल शिक्षण आरोग्य व पोलीस विभागाने आपले कर्मचारी नियुक्त केले होते. त्याचबरोबर मतमोजणी केंद्रावर देखील प्रशासनाची जय्यत तयारी सुरू असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Tags
news