महेंद्र सिंह राजपूत शिरपूर
राज्यातील मुदत संपणाऱ्या सुमारे 14234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीत याआधी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात होती .मात्र आता ग्रामपंचायत लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आली असून उद्यापासून ग्रामपंचायतीचे नामनिर्देशनपत्र हे ऑनलाइन सोबत ऑफलाइन देखील म्हणजेच पारंपारिक पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत
व .जुने बँक खाते देखील धरले जाणार ग्राह्य धरले जणार आहेत हे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा आहे या कालावधीत संगणक प्राणी प्रणालीद्वारे एकूण 3 लाख 32 हजार 864 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत मात्र हे दाखल करत असताना दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेटची गती कमी होणे, सर्वर च्या अडचण निर्माण होणे इत्यादी अडचणी बाबत आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाले आहेत. सदर बाब विचारात घेता इच्छुक उमेदवार नामनिर्देशन पत्रा पासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पद्धतीने ऑफलाइन करण्याच्या तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना तातडीने सूचना देण्यात आले असून नामनिर्देशनपत्र घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्याचे आदेश व याबाबतची प्रसिद्धी स्थानिक पातळीवर करण्यात यावी याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत .शिवाय असे पारंपारिक पद्धतीने स्वीकारले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र संगणक चालक यांच्या मदतीने संगणक प्रणाली मध्ये समाविष्ट करून घ्यावेत असे देखील आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे ग्रामपातळीवर ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासा निर्माण झाला असून ऑनलाइन सोबत पारंपारिक पद्धतीने देखील नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार यामुळे उमेदवारांचे अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत.
Tags
news
