दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला विविध संघटना पाठिंबा देत भारत बंदला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद





तालुका प्रतिनिधी, कृष्णा कोळी 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे  दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी कायद्याचा विरोध करत धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी केंद्रसरकार . दिल्ली येथे  होणाऱ्या लढाऊ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केले. महा विकास आघाडी व विविध सामाजिक,राजकिय संघटना  यांनी केद्र सरकारने आनलेला कृषी विधायक विरोधात आज रोजी  पुकारलेल्या  भारत बंद ला पाठिंबा देत केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कृषी विधेयक रदद होण्यासाठी भारतातील सर्व शेतकरयानी पुकारलेल्या भारत  बंदला असंख्य आंदोलनकर्त्यांनी  केंद्र सरकारने पारित केलेले शेती विधेयक कायदा हा शेतकरी विरोधी असून शेतकरी व शेतीवर निगडित व्यवसायाला भांडवलदारांच्या अधिनस्थ करणार आहे. सध्या पारित केलेले तिने कायदे हे शेतकरी विरोधात असून लोकशाहीला कमजोर करणारी आहेत तरी कृषी व्यवसाय व शेतकरी हा लोकशाहीचा कणा आहे तो वाचलाच पाहिजे . हा कायदा भांडवलदार व उद्योगपती यांना फायदेशीर असून त्यांच्यादृष्टीने बनवण्यात आल्याचं स्पष्ट होते . म्हणून या केंद्र सरकारच्या हुकूमशाही कायद्याविरोधात दिल्ली येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील महा विकास आघाडी,स्वाभिमानी शेतकरी संघटना,नर्मदा बचाव संघटना, AMIM ,आदिवासी एकता परिषद, माक्सऀवादी कम्यूनिस्ट पक्ष, महिला किसान आधिकार मंच, विचार धारा फाॅऊन्डेशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,भारतीय समता परिषद, Brsp, वंचित बहुजन पक्ष,फुले आंबेडकर स्टडी सर्कल ,अनेक संघटना एकत्र येऊन पाठिंबा दर्शविला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने