सासरच्या मंडळीनीच सुनेचा पुनर्विवाह करून समाजात आदर्श विवाह घडवला




( राजकुमार जैन बभळाज ) -- पुनर्विवाह व्हावे अशी सर्वांची इच्छा असते परंतु पुढाकार कोणी घेत नाही आजची सामाजिक परिस्थिती बिकट झाली आहे. मुलीचे प्रमाण कमी असले तरी चांगल्या वधु साठी चांगला वर मिळणे कठीण झाले आहे तर चांगल्या वरासाठी उत्तम वधू मिळणे फारच कठीण झाले आहे अश्या परिस्थितीत जो तडजोड करेल त्याचेच विवाह जुळतील असं अलिखित नियम होऊन गेला आहे. असाच एक आदर्श विवाह चोपडा शहरात पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडा येथील व चोपडा शहरातील लव्हली ट्रेव्हलचे संचालक स्व.सचिन हरकचंद सुराणा याचे जवळपास 3 वर्षा पूर्वी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले होते. त्याची धर्मपत्नी रिना नेमीचंद जैन घोडगाव ता. चोपडा,जि.जळगाव येथील होती. कमी वयातच ती विधवा झाली होती, आपल्या सुनेचे व मुलीचे संपुर्ण आयुष्य कसे निघणार ? या विवेचनात सासर व माहेरची मंडळी होती. रिनाची सासू श्रीमती लिलाबाई सुराणा ह्याही अगदीं कमी वयातच विधवा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जीवन जगताना पती विना पत्नीला जिवन जगणे कीती कठीण आहे व काय  काय यातना भोगावे लागतात हे लिलाबाईंनी  जवळून पाहिले होते त्यामुळे चांगला मुलगा मिळाला तर मी माझ्या सुनेचे लग्न लावून देईल असे ते नेहमी सांगत होते. त्यांची मनातील इच्छा त्यांनी त्याचे जेठ ताराचंद सुराणा, मोठा मुलगा संदिप सुराणा, भाऊ जवरीलाल कटारिया यांना सांगितली. त्यानुसार या सर्वांनी योग्य मुलगा शोधण्याचे काम सुरू केले .या शोधात त्यांनी मोहाडी जि. धुळे येथील स्व.लखीचंद नेमीचंद छाजेड यांचा मुलगा चि.पुनमचंद छाजेड ह्याला पसंद केले. त्या मुलाला देखील मुलगी पसंद आली आणि दि २७ /१२/२० रोजी सकाळी १ वाजता श्री स्वामीं समर्थ पेलेस चोपडा येथे आदेश बरडीया यांनी जैन पध्दतीने हे लग्न लावले. सासुनेच मुलगी समजून सुनेचे पुनर्विवाह करून दिल्याने हा विवाह सर्वच समाजासाठी आदर्श विवाह असल्याचे संपुर्ण खान्देशात व लग्नास उपस्थित मंडळी कडुन विशेष कौतुक होते आहे. यावेळी आशिर्वाद देण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा पिपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, संचालक नेमीचंद कोचर, संघपती गुलाबचंद देसरडा, पत्रकार लतीश जैन वधूचे मोठे वडील अशोक सांडेचा, दिलिप सांडेचा, घोडगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, तर वरपक्षाकडून पारसमल छाजेड, अशोकचंद छाजेड, हे उपस्थित होते तर लग्न जमविण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश छाजेड ,सतिश छाजेड, सुनिल छाजेड, तर वधूपक्षा कडून नेमीचंद सांडेचा, जवरीलाल कटारिया, राजेंद्र सुराणा, संदीप सुराणा यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ए.पाठक सर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने