शिरपूर तालुक्यातील विद्यार्थी व युवकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत

 


शिरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे, मा. अमितसाहेब ठाकरें यांच्या मार्गदर्शनाने व मा.आदित्य शिरोडकर साहेब. प्रदेशाध्यक्ष मनविसे, व मनवीसे धुळे जिल्हा संपर्क अध्यक्ष. मा. गणेश दादा बुरकुल यांच्या आदेशाने मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष  प्रसाद देशमुख यांच्या नेतृत्वात दि.२० डिसेंबर रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत शिरपूर तालुक्यातील असंख्य तरुणांनी मा. राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन जाहीर प्रवेश केला, व पद नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे,सोनू राजपूत, चेतन पाटील,राहुल शिराळे यांनी केले.
 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष.श्री संजय नंदुरबारे ,मनसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष.राकेश भाऊ चौधरी,अविनाश ठाकूर, समस्त पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने