कर्ज पुरवठा करणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंचसह मोबाईल aap पासून सावध रहा! जिल्हाधिकारी संजय यादव यांचे नागरिकांना आवाहन

 



 

धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : कर्ज पुरवठा करणाऱ्या अनधिकृत ऑनलाइन डिजिटल मंच, मोबाईल aap नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल aap विरुद्ध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सावाधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, जलद व विना अडचण कर्ज मिळण्याचे आश्वासन देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईलaap व्यक्ती, छोटे उद्योग वाढत्या प्रमाणात बळी पडत असल्याचे अहवाल येत आहेत. या अहवालात कर्जदारांकडून अधिकचा व्याजदर व छुपे आकार मागण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाही पध्दतीचा अवलंब करण्यात येत असल्याचे तसेच कर्जदारांच्या मोबाईल फोनवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहेत.

आरबीआयकडे नोंदणीकृत केलेल्या बँका, अबँकिय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडून विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज पुरवठा करण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये आणि ऑनलाईन,  मोबाईल aap कर्ज देवू करणाऱ्या कंपन्या, संस्थांचा खरेपणा, पूर्वइतिहास पडताळून पाहावा. याशिवाय, ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन न केलेल्या अनधिकृत aap कधीही शेअर करु नयेत. अशाaap संबंधित बँक खात्यांची माहिती, संबंधित कायदा अंमलबजावणी एजन्सीला कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा (https://sachet.rbi.org.in ) वापर करावा.

बँका व एनबीएफसींच्या वतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉम्सनी त्यांच्या ग्राहकांना बँक,  बँकांची किंवा एनबीएफसीची नावे सुरुवातीलाच सांगावीत. रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत केलेल्या एनबीएफसीची नावे व पत्ते तेथे अॅक्सेस केले जावू शकतात. आरबीआय कडून विनियमित केलेल्या संस्थांच्या विरुध्दच्या तक्रारी दाखल करण्यासाठीचे पोर्टल https://cms.rbi.org.in. मार्फत aap केले जाऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने