दोन महिने नव्हे तर दोनशे महिने शिवसेनेची सत्ता जाणार नाही : पालकमंत्री अब्दुल सत्तार




*दोंडाईचा (प्रतिनिधी)* : गरीबातील गरीब, शेतकरी, शेतमजुर, कामगार, कष्टकरी, दिनदुबळे यांना न्याय मिळत असेल तर ते फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात मिळत आहे. सामान्य जनतेचा विश्वासावर हे सरकार उभे आहे. त्यामुळे दोन महिने नव्हे तर दोनशे महिने शिवसेनेची सत्ता जाणार नाही, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी येथे केले.
       येथील सुवर्णकार मंगल कार्यालय, रोटरी आय हॉस्पीटल मागे, स्टेशन परिसर, दोंडाईचा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या सुरुवातीला ना.सत्तार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे महसुल व ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा ना.श्री.अब्दुल सत्तार व शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात यांच्या हस्ते नंदुरबार चौफुली, बस स्टॅण्ड दोंडाईचा व धुळे चौफुली हॉटेल मोनाली जवळ येथे शिवसेना फलकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर पदाधिकारी मेळाव्याला सुरुवात झाली.
       प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, शिंदखेडा विधानसभा संपर्कप्रमुख अनिल डेरे, नंदुरबार सहसंपर्क प्रमुख संजय उकिरडे, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटु पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत राजपुत, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीष देसले, शिरपूर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, दिपक चोरमले, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, विभाभाई जोगराणा, भाईदास पाटील, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, मनोज पाटील, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, शैलेश सोनार, शिरपूर शहरप्रमुख मनोज धनगर, महिला संपर्कप्रमुख प्रियंकाताई घाणेकर, ज्योतीताई पाटील, विद्याताई ठाकूर, सुनंदा पवार, सरिता महाजन, मिना चैनानी, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, डॉ.भरत राजपुत, गणेश परदेशी, मयुर कदमबांडे, प्रदीप पवार, मनोज पवार, शानाभाऊ धनगर, विजय सिसोदे, हिरालाल बोरसे, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना.सत्तार यांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
       भारतीय जनता पक्षावर हल्ला करतांना श्री.सत्तार म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यात शिवसेनेचा, शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपाने वचनाची पूर्ती केली असती तर युती तुटली नसती. 30 वर्ष शिवसेनेने साथ दिली. परंतु सर्वात जास्त त्रास शिवसेनेला दिला. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप महाराष्ट्रात वाढली. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे जे लोकापयोगी निर्णय घेतात ते सर्वसामान्यांच्या हिताचे असतात. त्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होतो. असे भाजपाचे लोक सुध्दा खाजगीत मान्य करतात. ग्रामपंचात निवडणुकीचा बिगुल वाजला असून धुळे जिल्हा ग्रामीणमध्ये जवळजवळ शंभर ग्रामपंचायतीत निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसैनिकांनी आता निवडणुक जिंकण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख यांना शासनाची शक्ती देण्यात येईल. त्यासह ग्रामपंचायतीला पायाभूत, मुलभूत सुविधा मिळण्यासाठी निधी मंजुर करणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे, असे आवाहनही ना.सत्तार यांनी केले.
       निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन व्हावे यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे. मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. पक्षात तरुणांना स्थान देण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे. कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यास शिरपूर, शिंदखेडा जिंकू शकतो. मला फोटोछाप शिवसैनिक नको तर गरीबांसाठी काम करणारा शिवसैनिक हवा आहे, असे परखड मत संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी मेळाव्यात व्यक्त केले. तर शिंदखेडा तालुक्यात 65 ग्रामपंचायती व शिरपूर तालुक्यात 34 ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शाखेत काम करणारा शाखाप्रमुख हा सरपंच झाला पाहिजे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करायला इच्छूक आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दोंडाईचा नगरपालिकेवर भगवा फडकावणारच असा निर्धार जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी व्यक्त केला.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाश कोळी यांनी केले तर आभार तालुका संघटक डॉ.मनोज पाटील यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दिपक मराठे, विजय भोई, राकेश पेठकर, चुडामण बोरसे, सागर पवार, दिनेश मराठे, सोनु कोळी, सुरेश कोळी, देवेंद्र अहिरे, अजय विसावे, गणेश विसावे, विक्रम अहिरे, नरेंद्र धात्रक, राजा ढोले, निलेश चौधरी, आकाश भोई यांनी परिश्रम घेतले.
        *यांनी केला प्रवेश* – दोंडाईचातील ज्ञानेश्वर कोळी, राकेश पाटील, दिपक काळे, पप्पू धनगर, प्रदीप धनगर, नरेंद्र वंजारी, विनय वंजारी, निखील ठाकूर, प्रणव सुतार, आदित्य राजपुत, विश्वजीत राजपुत, शिवम तेली, हर्षल राजपुत, गौतम पाटील, योगेश पाटील, योगेश बोरसे, शिरपूर खलाणे गटातून दिपक भामरे, हिंमत कोळी, राकेश कोळी, दिलीप कोळी, रविंद्र पावरा, मुन्ना पावरा, जितु पाटील आदी.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने