विद्यार्थ्यांना पास देण्यात यावेत या साठी मनवीसे ची मागणी



       शिरपूर - सबंध भारतात चीन मधून आलेल्या कोरोना या महारोगामुळे गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून लॉकडाऊन झालेले होते, त्यामुळे सर्वच शाळा - महाविद्यालय बंद होते. त्यानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरु झाली व विद्यार्थ्यांचे सध्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणुन राज्य शासनाच्या आदेशाने हळू हळू शाळा व महाविद्यालये सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
अश्यातच सध्यास्थितीत इयत्ता ९ वि ते १२ वि चे वर्ग सुरु झालेत आहेत व काही महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे,
त्यामुळे शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयात जाण्या -येण्यासाठी एस. टी महामंडळाच्या बसचा वापर करावा लागतो म्हणुन त्यांना बस चे पास मिळणे गरजेचे असल्यामुळे त्यांना तात्काळ बस चे पासेस ची सुविधा मिळण्याची व्यवस्था आपल्या स्तरावरून करून देण्यात यावी, तसेच या परिस्थितीत बऱ्याच ठिकानी बस ला थांबा आहे परंतु बस थांबत नाहीत.
तरी ज्या - ज्या ठिकाणी बस थांबा आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी बस साठी थांबलेले असतात अश्या ठिकाणी बस थांबवण्यात यावी अशी नम्र विनंती.
तरी आपण स्वतः यात लक्षात घालुन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा मनविसे तर्फे अतिशय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
   अश्या आशयचे निवेदन
आज शिरपूर अगरप्रमुख यांना देण्यास गेलो असता त्यांनी आमच्याशी भेट घेणे भेटले नाही व नंन्तर त्यांना फोन केला असता त्यांनी थोडा वेळ थांबा असं सांगितले व त्यांनतर फोन घेणे बंद केले आम्ही साधारण सव्वा तास प्रतीक्षा करूनही त्यांची उपस्थिती लाभली नाही त्यामुळे नाईलाजास्तव  त्यांच्या बैठक खुर्चीला प्रतिकात्मक निवेदन देण्यात आले.
मनसे महिला सेना राज्य सचिव. प्राचिताई कुलकर्णी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष. राकेश भाऊ चौधरी, मनविसे जिल्हाध्यक्ष.मनसे सहकार सेना धुळे जि.अध्यक्ष संजय नंदुरबारे, ऍड. प्रसाद देशमुख, जिल्हासचिव. गौरव गिते यांच्या आदेशाने मनविसे जिल्हा उपाध्यक्ष. पुनमचंद मोरे,शहराध्यक्ष. सोनू  राजपूत,चेतन पाटील,राहुल शिराळे, घनश्याम मराठे, शोएब खाटीक, प्रशांत राठोड, अनिल बंजारा, देविदास जाधव यांच्या वतीने देण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने