शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील आर सी पटेल विद्यालयात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक आर. एन.पवार यांनी ज्येष्ठ शिक्षक बी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
तत्पूर्वी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित संबोध बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली.
याप्रसंगी गणित शिक्षक एस. जी. पवार यांनी गणित संबोध आणि सिद्धांत या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर थोर गणितज्ञ रामानुजन यांनी कमी आयुष्यात गणिताला उंचीवर नेण्याचे महान कार्य केले असे मुख्याध्यापक आर्.एन. पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बी. एस. महाजन यांनी गणित दिवस साजरा करण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. कार्यक्रमाला विद्यालयाचे गणित व विज्ञान शिक्षक शिक्षिका तसेच इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एन.पाटील तर आभार श्रीमती जे.एन. पाटील यांनी मानले.
Tags
news
