पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स राऊत संजय राऊत त्यांच्या पत्नी




मुंबई - शिवसेनेचे फायरब्रॉंड नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय ( Enforcement Directorate ) कडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रा कडून समोर येत आहे . पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आल्याची  प्राथमिक माहिती आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. की, प्रताप सरदेसाई, एकनाथ खडसे याप्रमाणेच आपल्यालाही कधीही ईडीचे समन्स येऊ शकते. आता ईडी समोर वर्षा उपस्थित राहतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
या शिवाय या प्रकरणावरून राजकीय तापमान वाढण्याची शक्यता असून आरोप प्रत्यारोप वाढणार असून इ डी केंद्रच्या इशारा वर काम करत आहे आणि म्हणून सेना च्या नेत्यावर टार्गेट केले जात असल्याचे आरोप होत आहेत मात्र इ डी आपले काम करत आहे आणि कर नाही तर डर का अशी प्रतिक्रिया देखिल राजकिय वर्तुळातुन समोर येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने