शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून दिनांक 28 डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाले आहे. यात आज दिनांक 30 डिसेंबर रोजी शिरपूर तालुक्यात होऊ घातलेल्या 34 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी 645 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.यात हिंगोनी बु. 7, शिंगावे 44 ,कळमसरे 39,साकवद 10, मांडळ 32, गरताड 13 , बाभुलदे 13,ऊपर पिंड 9 ,सावळदे 07 ,असली तांडे 26 ,भोरखेडा 21,भटाने 29, जवखेडा 09,वरुड 19 , जुने भामपुर 09, विखरण 12, होळ 34भावेर 11, पिंपडे तांडा 07, भाटपुरा 37, नत्वघोडसगाव 07,नटवाडे 17 ,हिंगोनी पाडा 18, जमन्या पाडा 25, दहिवद 13 , शेमल्या 25, चाकडू 68, बाळदे 05, कुवे 17,बालकुवा मुखेड 29, टेकवाडे 09, बोरगाव 06 जातोडे 28 असे नाम निर्देशन पत्रांचा समावेश आहे. तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींपैकी आज 33 ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून तालुक्यातील वाठोडा ग्रामपंचायतींसाठी आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.
त्यात तालुक्यातील घोडसगाव, पिंपळे तांडा,वाठोडा या ग्राम पंचायती स्थानिक पातळीवर बिन विरोध झाल्या आहेत मात्र या बाबत अधिकृत घोषणा शासन पातळीवरून होणे बाकी आहे . भोरखेडा ग्राम पंचायत देखील बिन विरोध होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.छाननी अंती व माघारी नंतर या निवडणूकीचे अंतिम चित्र समोर येईल.4 तारखेच्या माघारी नंतर ग्रामपंचायत निवडणुकीत रंग भरला जाईल.
.
Tags
news
