यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराना 50 हजाराचे अर्थसहाय्य




नंदुरबार दि.2: संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परिक्षा 2020 चा निकाल 23 ऑक्टोंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला असून उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेकरिता एकरकमी 50 हजार रुपयाचे अर्थसहाय्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी ) मार्फत देण्यात येणार आहे.

बार्टीच्या संकेतस्थळावर यासाठीचे निकष आणि अर्ज उपलब्ध असून अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडून बार्टीच्या ई-मेल वर 8 डिसेंबर 2020  सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवावे . या योजनेचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने