पाच पिस्तुलांसह दोघे अटकेत.....



 
मुंबई : सांताक्रूझ परिसरात जुहू चौपाटीवर पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. 
 सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. 
त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि ४० काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. 
याप्रकरणी तारसूम आम्रिक सिंग ऊर्फ बबलू सरदार (४०) आणि उदयसिंग प्रतापसिंग बिस्ट (४१) यांना पोलिसांनी अटक केली. 
दोघेही मध्य प्रदेशातील उज्जन येथील रहिवासी असून तेथून शस्त्रांच्या विक्रीसाठी ते मुंबईत आले होते. 
मध्य प्रदेशातील दोघेजण पिस्तूल विक्रीसाठी जुहू चौपाटीवर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांना खबऱ्यांकडून मिळाली. 
त्यानुसार गावडे यांनी पथकासह जुहू चौपाटी येथे सापळा रचून तारसूम आणि उदयसिंग यांना अटक केली. 
त्यांच्याकडून मिळालेल्या चार पिस्तुलांवर ‘मेड इन मुंगेर’ आणि एकावर ‘मेड इन यू.एस.’ असे लिहिले होते. 
तसेच फक्त लष्करी वापरासाठी असेही लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
मात्र ही पाचही शस्त्रे देशी बनावटीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
दोघांना ९ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने