प्रसिद्ध निवेदक.. द्रष्टा वक्ता कै.तपस्वी राणे यांची शोकसभा भावपूर्ण निरोपात संपन्न...!






जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ..जिच्या वैखरीतून सरस्वती वदत होती अशी मूर्तीमंत पवित्र मूर्ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके निवेदक मित्रं.. चतुरस्र आणि हरहुन्नरी कलावंत कै.तपस्वी परशुराम राणे (लाडके तपूदादा) ज्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने राणे कुटुंबीयांत...वाद्यवृंद क्षेत्रांत , कलाक्षेत्रात तसेच सिने नाट्य सृष्टीत कमालीची पोकळी निर्माण झालेली आहे.. त्यांची आठवण हीं कायमस्वरूपी स्मरणात रहावी या हेतूने  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल डिस्टन्सचे भान ठेवून रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राशी स्टुडिओ, करिरोड, मुंबई  ४०० ०१२ येथे सकाळी ११.०० ते दुपारी  २.०० च्या दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यां शोकसभेत अनेक दिग्गज कलावंतांनी कै.तपस्वी राणे यांना सुमनांजली वाहून श्रद्धांजलीपर आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ संगीत संयोजक अशोक वायंगणकर, ज्येष्ठ शाहीर कृष्णा खामकर, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, निवेदक उमेश सावंत, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, अभिनेते विलास (बाळा) चौकेकर,  जयवंत भालेकर, प्रशांत भाटकर, निर्माता सचिन पाताडे, अभिनेत्री उषा साटम, नैना राणे, लावणी सम्राज्ञी मेघा करंगुटकर, कला दिग्दर्शक सुनिल देवळेकर, राकेश शेळके, माझगाव डॉकचे विनय आपटे, तपस्वी बंधू भगवान (सुरू) राणे आदी सर्व कलावंत..तंत्रज्ञ.. वाद्यवृंद कलावंत उपस्थित होती. 

महेश्वर भिकाजी तेटांबे
सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार
९०८२२९३८६७

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने