वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांची मागणी



 शिरपूर प्रतिनिधी-  शिरपूर तालुक्यातील व धुळे जिल्ह्यातील वृद्ध निराधार नागरिकांना मिळणाऱ्या निवृत्त वेतन लाभात वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे यासाठी शिरपूर तालुका व धुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊ सो तुषार रंधे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे. शासनाकडुन वृद्ध निराधार नागरिकांना आधार मिळावा म्हणून त्यांच्या खात्यात दरमहा विशिष्ट रक्कम जमा करण्यात येते तसेच निवृत्‍ती धारकांना निवृत्तीवेतन दिले जाते मात्र यासाठी काही नागरिकांकडून शाळेच्या दाखल्याची मागणी बँकांकडून केली जात आहे. मात्र जुन्या काळातील शाळेचे दाखले अनेकांकडे उपलब्ध होत नसल्याने ते या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे .त्यामुळे यापूर्वी ज्याप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते त्यानुसार शाळेच्या दाखल्या ऐवजी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात ग्राह्य धरण्यात यावे अशी मागणी डॉक्टर तुषार रंधे यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे केली आहे. अनेकांना शाळेचा दाखला मिळणे कठीण होत असून तहसील कार्यालयाकडून या योजनेच्या प्रकरणाबाबत प्रस्ताव मागून विशिष्ट समितीतर्फे त्याची तपासणी केल्यानंतर या प्रकरणाला मंजुरी दिली जाते मात्र यांचे वितरण बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात होते अनेक बँक या योजनेतील लाभार्थी तसेच निवृत्ती धारकांकडे वयाचे प्रमाणपत्र साठी शाळेच्या दाखल्याच्या आग्रह धरतात मात्र अनेकांना असा दाखला मिळणे कठीण होत असल्याने अनेक लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी मागणी केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने