नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून
नाशिक - पंचवटी पोलीस ठाणे कडील गुरनं ६३६/२०२० भा.दं.वि.कलम ३९४,३६३ ,३४ प्रमाणे दि. २६/११/२०२० रोजी दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी नामे राहुल प्रदीप फेगडे वय २८ वर्ष व्यव.ओलाकब चालक रा.फ्लॅट नं.१६, साईपॅलेस अपा., उत्तमनगर, सिडको, नाशिक यांनी पोलीस ठाणेस हजर येवुन फिर्याद दिली की, दि.२४/११/२०२० रोजी १९:०० वा.चे अनोळखी इसमांनी फिर्यादी चालवित असलेली राज नागराज पाटील रा.उत्तमनगर, सिडको, सुमारास चार नाशिक यांचे मालकीची महिंन्द्रा कंपनीची वेरीटो गाडी क्र. MH-15-E-7837 ही ओला कंपनीकडे सिन्नरला जाण्यासाठी बुक करून त्यानंतर सदर इसमांनी फिर्यादीस सिन्नर येथे न नेता शिर्डीला घेवुन जावुन सदर इसमांनी फिर्यादीचे हात बांधुन फिर्यादीस मारहाण करून तु आम्हाला तीस हजार रूपये दिले तर आम्ही तुझी गाडी तुला परत देवु नाहीतर आम्ही गाडी घेवुन जावु अशी दमदाटी करून फि्यादीचे ताब्यातील २,००,०००/- रूपये किंमतीची महिंन्द्रा कंपनीची वेरीटो गाडी कृ. MH-15- E-7837 ही गाड़ी तसेच १५,०००/- रूपये किंमतीचे दोन मोबाईल फोन त्यामधील सिमकार्डसह व फिर्यादीचे ए.टी.एम. असा एकुण २,१५,०००/- रूपये किंमतीचा माल फिर्यादीकडून बळजबरीने कादुन घेवुन त्यानंतर फिर्यादीस गाडीतुन उतरून देवुन सदर इसम हे जबरी चोरी करून निघुन गेले बाबत गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने मा.वरिष्ठांचे आदेशाने लागलीच पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सपोनि/सत्यवान पवार, पोहवा/ मलंग गुंजाळ, पोना/दिलीप बोंबले, पोशि/संदीप गाडे, पोशि/कल्पेश जाधव, पोशि/घनश्याम महाले यांनी तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोउपनि/देसले, पोशि/रामनाथ पाटील यांचे मदतीने कसोशीने व कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्हयातील अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा करणारे दोन विधी संघर्षित बालक यांना कोपरगाव शहर ता.कोपरगाव जि.अहमदनगर व दुसरा विधीसंघर्षित बालक यास मांची ता.संगमनेर, जि. अहमदनगर येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयातील चोरीस गेलेली २,००,०००/- रूपये किंमतीची महिन्द्रा कंपनीची वेरीटो गाडी क्र. MH-15-E-7837 ही ओलाकॅब गाड़ी येवला मनमाड रोड येथुन हस्तगत करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/विशाल गिरी हे करत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा.श्री.दीपक पाण्डेय् पोलीस आयुक्त सो नाशिक शहर, मा.श्री.अमोल तांबे पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ १, मा.श्री. प्रदिप जाधव सहायक पोलीस आयुक्त साो विभाग १, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोनि अशोक साखरे (गुन्हे) पंचवटी पोलीस ठाणे,नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार, सपोनि/विशाल गिरी, पोहवा / मलंग गुंजाळ, गाना /दिलीप बोंबले , पोशि/संदीप गाडे, पोशि/कल्पेश जाधव, पोशि / घनश्याम महाले यांनी तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोउपनि/देसले, पोशि/रामनाथ पाटील यांचे मदतीने पार पाडली.
Tags
news
