⭕ तरुणीच्या छेडछाड, विरोध करणाऱ्या वडिलांची आरोपींनी केली हत्या !

  


 
हाथरसमध्ये घडलेल्या अमानुष प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात गुंडाराज ऐरणीवर आला आहे. 
याबाबत आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. 
आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या बापाला छेडछाड करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण करुन ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 
येथील देवरिया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
 ए.एन.आय.च्या वृत्तानुसार, पीडित मुलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने छेड काढली होती. 
यामुळे रागावलेल्या मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती. 
यानंतर रागाने पेटलेल्या या आरोपी तरुणाने काही लोकांना घेऊन त्या मुलीच्या घरी पोहोचला. 
या लोकांकडे हत्यारं होती. 
घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 
मारहाणीमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या वडिलांनी आपले प्राण सोडले. 
याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. 
या घटनेनंतर मुलीच्या गावात प्रचंड तणावाची स्थिती आहे. 
पोलिसांनी याप्रकरणी ६ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 यांपैकी तीन जण प्रसिद्ध व्यक्ती आहेत. 
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या गुंडांनी  संध्याकाळी पीडित मुलीची छेड काढली. 
याबाबत मुलीच्या वडिलांनी आरोपी मुलाकडे तक्रार केली मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले आणि मुलीच्या वडिलांसोबतच भांडायला लागला. 
त्यानंतर चिडलेल्या मुलीच्या वडिलांनी त्याला थप्पड लगावली.
 यानंतर चवताळलेल्या आरोपी तरुणाने आपल्या सहकार्यांसह मुलीच्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.
 या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने