मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेला सुरुवात




शिरपूर - धुळे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर च्या दरम्यान संपत आहे त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतीच्या तारीख मतदान याद्या तयार करून त्या एक डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर मध्ये संपत आहे त्या ग्रामपंचायतीच्या प्रारुप मतदार याद्या एक डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहेत राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक  संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून त्यानुसार एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपलेल्या तसेच जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील 14233 ग्रामपंचायतींच्या मतदान यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यात शिरपूर तालुक्यातून 34 ग्रामपंचायतींचा समावेश असून या ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेर संपत आहे त्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदान यादी प्रसिद्धीच्या कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. तालुक्यातील बाबुळदे ,वरुड ,शेमल्या टेकवाडे ,कळमसरे ,विखरण, जुने भामपुर, चाकडू, मुखेड ,बलकुवे, नटवाडे, शिंगावे, भाटपुरा, असली ,घोडसगाव ,बाळदे ,वाठोडे, होळ, गोदी , उप्परपिंड, दहिवद, जामन्यापाडा अशा ग्रामपंचायतींच्या यात समावेश आहे. याआधी कोरोणामुळे सदरच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या होत्या मात्र आता प्रारूप मतदान यादी साठी 25 सप्टेंबर 2020 ची मतदार यादी ग्राह्य धरली  जाणार आहे. त्यानुसार एक डिसेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्धी दिली जाईल त्यावर 7 डिसेंबरपर्यंत नागरिकांकडून सूचना हरकती मागवण्यात येणार आहेत तर 10 डिसेंबर रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या मुळे शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकी च्या हालचालींना वेग आला आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने