**शहादा*= असलोद गावात अवैधरित्या धदे चालतात याची गेल्या दहा वर्षा पासुन गावकरी असलोद पोलीस स्टेशन पासुन ते जिल्ह्यातील वरिष्ट पोलीस अधिकारी पर्यत व उत्पादन शुल्क विभागास एवढेच नाहीतर शहादा तहसिल पासुन ते गृहमंत्रालय कार्यालया पर्यत ग्रामसभेचे ठराव व निवेदने दिली परतु आज पर्यत उत्पात्दन शुल्क विभागाने व पोलीसांनी असलोद गावात ढाब्याच्या नावाखाली व ईतर चालणाऱ्या अवैध दारुविक्रिवर कठोर कारवाई करुन याचे कायमचे उच्चांटन केलेले कधीच गावकऱ्यांना दिसले नाही.थातुर मातुर कार्यवाही करुन गावकऱ्यांना शांत करण्याचेच काम केल्याचे गावकऱ्याचे लंक्षात आल्यामुळे आता असलोद गावकऱ्यांनी असलोद गावात दारूबंदी व्हावी यासाठी व ढाब्याच्या नावाखाली अवैध दारु विक्रेत्यानवर कायमची ठोस कारवाई व्हावी यासाठी नाशिक विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव आर.दिगावकर व नाशिक विभागीय उत्पादन शुल्क उप आयुक्त याच्याकडे दारुबंदीच्या निवेदनाचीफाईल देण्यात आली आहे.असलोद गावात पोलीस्टेशन असुनसुद्धा गेल्या दहा वर्षापासुन अवैध चालतात आणी पोलीस विभाग व उत्पादनात शुल्क विभागाने आजपर्यंत यांच्यावर ठोस कारवाई केली नसल्याचे फाईल मधिल निवेधनावरुन समझजल्याने असलोद पोलीस स्टेशनमध्ये आज पर्यत कार्यरत काम करणाऱ्या सर्वच पोलीसाच्या व शहादा उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजा बाबत प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थीत केल्याने वरिष्ट अधिकाऱ्यांनकडुन याबाबत आर्चय व्येक्त करण्यात आले.
असलोद गावात हाॅटेल व्येवसायाच्या नावाखाली अवैध दारु विक्री होते हे दारुबंदीच्या फाईल वरुन लंक्षात आल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ प्रतापराव आर.दिगावकर यांनी तात्काळ यावर कार्यवाही व्हावी यासाठी शहादा ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये नवीन कार्यरत आय.पी.एस.पोलिस अधिकारी यांना तक्रारि निवेदनाचे गांभीर्यपूर्वक दखल घेवुन त्याबाबत खुलासा ध्यावा असे सांगितले आहे.वरिष्ट स्तरावरिल दिलेल्या तक्रारीची फाईल शहादा वरिष्ट पोलिस अधिकारी याना देण्यात येणार आहे.तसेच नाशिक उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त यांनी देखील तात्काळ नंदुरबार उत्पादन शुल्क यांच्याशी सर्पक करुन असलोद गावातील दारुबंदीच्या कार्यवाही बाबत माहिती घेतली त्यात असलोद ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा नाहरकत दाखला दिला नसतांना का बियर शाॅपीचे लायसन दिले ?असलोदगाव पेसा अर्तगत आहे अशा ठिकाणी लाईसन देता येते का ? अशी माहिती ची विचारणा करण्यात आली यावर नंदुरबार राज्य उत्पादन विभागाकडुन उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशीक यांनी खुलासा मागीतला आहे.तोच माहीतीचा खुलासा असलोद गावकऱ्यांनी देखील मागीतला आहे.नाशिक विभाच्या दोन्ही वरिष्ट अधिकाऱ्यांनी तात्काळ अवैध दारु विक्री बाबत व असलोद गावातील दारुबंदीची दखल घेतल्याने यापुढे काही दिवसात खालच्या जिल्हा स्तरावरुन असलोद गावकऱ्याच्या दारुबंदीच्या व ढाब्याच्या नावाखाली अवैध दारु विक्री करणाऱ्यानवर काय कारवाई करतिल याकडे लंक्ष गावकऱ्याचे लागले आहे कार्यवाही झाल्यावर वरिष्ट अधिकारी खालच्या अधिकाऱ्यान कडुन यांचा अहवाल मागविण्यात येणार आहे असे निवेदन देणारे राजु वानखेडे यांनी सांगितले.सदर निवेदनाची तात्काळ निवेदनाची दखल घेतल्याने दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्याचे आभार मानन्यात आले.
*दिलेल्या तक्रारी निवेधनात चार विषयावर दखल घेण्याची मागणी*
असलोद गावकऱ्यांनी नाशिक दोन्ही वरिष्ट अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात चार विषयावर दखल घेण्याची मागणी केली आहे.त्यात असलोद गावात अवैध धंदे सुरू आहेत ते तात्काळ बंद व्हावेत,असलोद गावात दारूबंदी कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी असलोद पोलीस स्टेशन व उत्पादन शुल्क विभाग शहादा याना शासन स्तरावरुन अवैध धदे बंद करण्याचे आदेश त्वरित पारित व्हावे, नंदुरबार जिल्हा अधिकारिनी दारुबंदीसाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणुक घ्यावी याचे आदेश दिले असुन त्याची अंमलबजावणी होऊन त्यावर कार्यवाही व्हावी .तसेच मागील शासनाच्या विविध विभागाना दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी. असे विषय निवेधनात नमुद असल्याचे दिसत आहेत. गावकऱ्याच्या वतिने असलोद गावातील शिक्षीत युवक राजु वानखेडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना गावातील काही नागरिक व सुशिक्षित मित्र मंडळी असलोद गावात दारूबंदी व्हावी यासाठी सहकार्य करण्यासाठी उपस्थीत होते.या निवेदनावर गावातील ग्रामस्थाच्या साडेतिनशेच्या आसपास दारुबंदी साठी सह्या दिल्या आहेत.काही लोकाच्या सह्या राहील्याने त्यानीही दारुबंदीसाठी पाठीबा दिला आहे. प्रतिनिधी. कृष्णा कोळी असलोद
Tags
news
