अहिल्यापुर गावातील जुगार खेळणाऱ्या वर पोलिसांचा छापा, 20 हजारांचा मुद्देमाल व 8 आरोपी ताब्यात




शिरपूर प्रतिनिधी -  थाळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन  साळुंखे यांच्या पथकाने अहिल्यापुर गावात जाऊन पंचांसमक्ष छापा टाकला असता छाप्याच्या ठिकाणी रमेश चंदजैन यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ झाडाखाली बसून काही लोक पत्त्यांचा खेळ खेळताना दिसून आले .सदर ठिकाणी सापळा रचून सदर जागी छापा टाकला असता सदरच्या ठिकाणी 8  लोकांना  पकडण्यात आले असून त्यांच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 
सदरची कारवाई आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आली .जागेवर पकडण्यात आलेल्या इसम  मध्ये 1. रवींद्र शामराव कोळी ,वय 31, 2. अमृत नथू जाधव वय 45 ,3. योगेश राजेंद्र जाधव वय 24, 4 नानकु ताणकु भिल वय 65 ,5. कृष्णा शिरसाठ वय ,40 6.धनराज भैय्या उर्फ उत्तम जावळे वय 34 राहणार सर्व अहिल्यापुर तालुका शिरपूर 7. नानाभाऊ वामन गुरव, वय 55,  8. किशन कृष्ण वाणी  वय ,53, दोघे राहणार भद्रा चौक जनता नगर शिरपूर  जिल्हा धुळे याना  पंचांसमक्ष जुगार खेळताना आढळून आल्यामुळे पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे  सदरच्या इसमाकडून कडून 2500 रु रोख व 1000 रुपये किमतीच्या सॅमसंग मोबाईल, शामराव कोळी यांच्या कडून, 5000 रु रोख व 4000 चा मोबाईल, अमृत जाधव यांच्या कडून,7500 रु रोख 7000 रु किमतीचा मोबाईल,योगेश जाधव यांच्या कडून,580 रु तानकू भिल यांच्या कडून,1500 रु रोख व 1000चा मोबाइल, कृष्णा शिरसाठ,यांच्या कडून,800 रु रोख उत्तम जावळे यांच्या कडून, 1200 रु रोख नानाभाऊ गुरव यांच्या कडून,500 रु रोख किशन वाणी यांच्या कडून, अंगझडतीत मिळून आला असून डावात मांडलेले 1000 रु व 52 पत्त्याचा कॅट, असा एकूण 20,580 रुयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल उन्मेष सुधीर आळदे यांच्या फिर्याद नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कोळी, जाधव, मालचे ,होमगार्ड शिरसाठ, सूर्यवंशी, यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने