धुळे जिल्यातील कोरोना बांधित पत्रकारांसाठी राखिव बेड द्यावे - जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी

                    


                                                         *शिरपूर* : कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या धुळे जिल्ह्यात असताना या महामारी विरुध्दच्या लढाईत सुरवातीपासून पत्रकार बांधव फ्रंट लाईनवर कार्यरत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित पत्रकारांची संख्या अल्प जरी असली तरी आपल्या जिल्ह्यातील पत्रकारांची जन्मभूमी व कर्मभूमी हिच आहे. आपल्या जिल्ह्याच्या हद्दीत अनेक पूर्णवेळ व अंशकालीन माहिर पत्रकार राहतात. पत्रकार या नात्याने काम करताना त्यांना संसर्गाची लागण होवू शकते म्हणून शासकीय रुग्णालयात कोविड १९ बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांचाकडे (दि.८ आॅक्टो) रोजी निवेदनाव्दारे केली आहे. जिल्हाचे पालक मंत्री ना. अब्दुल सत्तार यांना हि ईमेलने निवेदन पाठवण्यात आले आहे. भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि गेल्या सहा महिन्यात कोविड -१९ ने धुळे जिल्हयात अनेक पत्रकारांना बाधा झालेली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाले असले तरी संकट अजूनही टळलेले नाही. म्हणुन बाधित होणाऱ्या पत्रकारांना सन्मानदेत उपचारासाठी राखिव बेडची व्यवस्था व्हावी. व मोफत उपचार करण्यात यावेत अशी हि मागणी भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांचाकडे केली आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने