मुमुंक्ष निधी दिदी कोटडीया यांचा शहादा येथे अभिनंदन समारोह संपन्न



शहादा-येथे आज दि. 4.10.2020 रोजी नंदूरबार येथील मुमुंक्ष भगिनी निधी जयप्रकाश कोटडीया यांचा श्री. अखिल भारतीय साधुमार्गी जैन संघाच्या वतीने अभिनंदन समारोह पार पडला, मुमुंक्ष निधी जयप्रकाश कोटडीया, वय -18,रा.नंदूरबार ह्या दि. 21आँक्टो.2020 रोजी जोधपुर (राजस्थान) येथे श्री. अखिल भारतीय साधुमार्गी जैन संघाचे आचार्य, व्यसनमुक्ती चे प्रणेते प. पु. श्री. रामेश मुनीजी महाराज साहेब यांच्या मुखारविंदाने जैन भगवती दिक्षा अंगीकार करणार आहे, त्या अनुषंगाने आज शहादा येथील श्री. अखिल भारतीय साधुमार्गी जैन संघाच्या वतीने त्यांचा आणित्यांचा पिताश्रींचा अभिनंदन समारोह, व पुढील संयम पथावर मार्गक्रमण करण्यासाठी आशिर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी शहादा येथील श्री. अ. भारतीय साधुमार्गी जैन संघाचे अध्यक्ष जेठमलजी कोटडीया, अमरचंदजी चोरडीया, मोहनलाल जी चोरडीया, बनेचंदजी बोथरा, प्रकाशचंद कोटडीया, श्री. महावीर पतससथेचे संस्थापक  चेअरमन रमेशचंदजी चोरडीया, विनयजी गांधी, जसराजजी कोटडीया, व जैन समाजातील बंधू, भगीनी, नवयुवक मंडळ, कन्या मंडळ आदि उपस्थितहोते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने