मंदिरे खुली करण्यासाठी हिरकणी महिला बचत गटाकडून पालकमंत्र्यांना निवेदन




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यात व शिरपूर शहरात आज जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली होती यावेळी हिरकणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष किर्ती ताई पाटील यांनी शहरातील मंदिरे खुली करण्याबाबत निवेदन सादर केले आहे यात प्रामुख्याने हिंदू धर्माच्या नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून आदिशक्ती मातेच्या नऊ दिवस हा महोत्सव सुरू असतो या काळात पूजाअर्चा, होमहवन व आहुती दिल्या जातात ज्यामुळे प्रदूषण नियंत्रणात राहून वातावरण शुद्ध होण्यास मदत होते ज्यावेळेस सायन्स संपते त्यावेळेस अध्यात्म कामी येत असते या सर्व बाबींचा विचार करून नवरात्र उत्सवात बंद असलेली सर्व मंदिरे उघडी करण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने