शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाई बनावट दारू कारखाना उध्वस्त




 शिरपूर प्रतिनिधी-  शिरपूर तालुक्यातील सांगवी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असलेला बनावट दारू कारखाना उध्वस्त करण्यात तालुका पोलीस स्टेशनच्या पथकास यश आले असून पोलिसांच्या कारवाईत बनावट दारू साठा व त्यास लागणारे साहित्य जप्त करण्यात आले असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत लाकडे हनुमान या गावाजवळ एक इसम बनावट दारू तयार करून तिची चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याबाबतची गोपनीय माहिती तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आणि बातमीच्या ठिकाणी दिनांक 13 रोजी 17.30 वा  छापा टाकला असता सदर ठिकाणाहून धनराज रेशम्या पावरा हा बनावट दारू बनवण्याचे काम अर्धवट सोडून पळून गेला. एका घराच्या झोपडीमध्ये बनावट दारू बनवण्याचे साहित्य कब्जात बाळगून लोकांच्या आरोग्यास हानीकारक अशी बनावट दारू तयार करून चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने तयार केली जात होती .यावेळी पोलीस रेड चाहूल लागताच एक इसम पळून गेला. 
 सदरच्या कारवाईत दोन लाख 70 हजार रुपये किमतीचे निळ्या रंगाचे 200 लिटर चे 9 ड्रम किंमत प्रत्येकी 30,000 रुपये, 800 रु किमतीचे रिकामे कॅन ,500 रु किमतीचे टॅंगो बाटलीचे बूच , 2000 रुपये किमतीच्या टेंगो बाटलीच्या लेबल असलेल्या बाटल्या, 14 ,400 रुपये किमतीचे टॅंगो पंच ब्रँडचे दारूची खोके, असा एकूण 2 लाख 97 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस नाईक संतोष भगवान देवरे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस स्टेशनला भादवि कलम 328, 420 ,468 ,480 ,488 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील ,पोसई दीपक वारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील, सुनील मोरे, संजीव जाधव, पवन गवळी ,कुंदन पवार ,आरिफ पठाण ,जामसिंग पावरा ,महिला कर्मचारी सुनीता पवार, शितल खैरनार इत्यादींच्या पथकाने केली आहे.
या बाबत पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित सो,अपर पोलिस अधीक्षक डॉ प्रशांत बच्छाव सो, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सो यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने