शिरपूर : तालुक्यातील जळोद येथे जिल्हा परिषद अंतर्गत शिरपूर पॅटर्न च्या २४७ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन दि. २६ ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी १२.३० वाजता माजी मंत्री अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशीराम दादा पावरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार काशिराम दादा पावरा, डॉ. तुषारभाऊ रंधे (अध्यक्ष जिल्हा परिषद धुळे), बबनराव चौधरी (प्रदेश सदस्य, भाजपा महाराष्ट्र), पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, भीमराव ईशी (सदस्य जिल्हा परिषद धुळे), राहुल पावरा (सदस्य पंचायत समिती शिरपूर), अरुण धोबी (माजी जिल्हा सरचिटणीस भाजपा), किशोर माळी (तालुकाध्यक्ष भाजपा), अशोक कलाल (स्वीय सहाय्यक), आनंदसिंग भंडारी (सरपंच जळोद, शिरपूर), जगदीश पावरा (उपसरपंच जळोद), इशेंद्र कोळी (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर, धनंजय पाटील (प्रियदर्शिनी सहकारी
सूतगिरणी संचालक), भामपूर चे सरपंच बाळासाहेब पाटील, पप्पू पाटील, सुरेश पितांबर पाटील (ग्रामपंचायत सदस्य भटाणे), अधिकारी भटूरकर, सुनील चौधरी,
अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळोद येथे जिल्हा परिषद अंतर्गत शिरपूर पॅटर्न च्या २४४ ते २४७ व्या बंधाऱ्याचे म्हणजेच एकूण चार बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
Tags
news
