रिपाई आठवले गटाच्या वतीने पोलीस कर्मचारी गुलाब सोनार यांचा नागरी सत्कार.




नाशिक शहर पोलीस महाराष्ट्रत सर्वात गतीशील व दक्ष : - महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे
नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक-: आज  शनिवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने नाशिक शहर क्राईम ब्रांच पोलीस कर्मचारी गुलाबराव सोनार यांनी सुट्टीवर असतांना देखील मोठ्या शिताफिने शहरात धुडगूस घालणाऱ्या सराईत चोरांना पकडून आपले कर्तव्य बजावले त्या मुळे त्याचा व त्याच्या सौभाग्यवती ज्योती सोनार यांचा आज यथोचित सत्कार करून सन्मान केला..कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र रणरागिणी व नाशिक जिल्हाप्रमुख महिला आघाडी सौ.गुंफाताई भद्रगे  यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे हे होते.

कार्यक्रमास श्री सुनील मेंदने सर आरपीआय महिला आघाडी नेत्या व पोलीस आयुक्त शांतता समिती सदस्या सौ.सविताताई अनिलभाई गांगुर्डे श्री संदीपभाऊ केदारे लताताई शेळके सुनीता सदावर्ते सखूताई विणकर संजीवनी वाकले सविता वाहुले रेखा शेळके आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन विक्रांत गांगुर्डे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने