प्राथमिक आरोग्य केंद्र-रोहिणि येथे रुग्ण कल्याण समितीची सभा संपन्न




शिरपूर -आज रोजी रोहिणि केंद्रात जि.प.सदस्य श्री कैलासभाऊ पावरा यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आलेली होती.सभेस जि.प.सदस्य दहिवद गट सहअध्यक्ष म्हणुन उपस्थित होत्या.रोहिणि गटाचे पस सदस्य श्री.बागल्या पावरा व आंबे गटाचे पस सदस्य श्री.दिनेश पावरा हजर होते.रोहिणि येथिल आयुष डाॅ.आनंदराव पावरा,श्री.कडु जाधव,श्रीमती वळवी मॅडम,श्रीमती रंजना पाटील ,नियामक मंडळाचे व कार्यकारी मंडळाचे बहुतांश सदस्य होजर होते,कोरमपुर्ण झाल्याने दोन्ही सभा यशस्वीपणे संपन्न झाल्या.सर्व सदस्यांच्या हस्ते माझेकुटुब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसरि फेरीचे उद्घाटन करण्यात आले.सर्व सदस्यांचा वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाज विषयी सदस्यांनी समाधान व्यक्त केले.व असेच काम पुढेही सुरु ठेवा आम्ही सदैव सहकार्य करु अशा भावना  व्यक्त केल्या.
कार्यक्रम यशस्वी साठी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे सह सर्व आरोग्य कर्मचारीवर्ग यांनी प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने