आ.रोहीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपुर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व रोहीत दादा पवार विचार मंच यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर

  



कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपुर येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व रोहीत दादा पवार विचार मंच यांच्या माध्यमातून शिरपुर येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.कोरोणाचा वाढता प्रभाव बघता रक्ताचा तुटवडा जाणवु नये म्हणुन आ.रोहीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे  व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे नाशिक विभागीय अध्यक्ष चिन्मयजी गाढे रोहीत दादा पवार विचार मंच चे जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रवादी सांस्कृतिक व कला सेलचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील तालुकाध्यक्ष रमेश आबा करंकाळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष दादा अहिरे शिरीष पाटील राहुल साळुंखे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील शिरपुर शहर अध्यक्ष भुपेश पाटील रोहीत दादा विचार मंच चे तालुकाध्यक्ष कुलदीप जाधव शिरपुर शहराध्यक्ष राहुल माळी अक्षय पवार अमोल राजपुत है उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील शिरपुर शहर अध्यक्ष भुपेश पाटील व रोहीत दादा पवार विचार मंच चे कुलदीप जाधव राहुल माळी अक्षय पवार आदीनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने