परदेशात शिक्षणासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखापर्यंत




नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.15 : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,नवापूर रोड नंदुरबार ( दूरध्वनी क्रमांक 02564-210303) येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने