शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या कारवाई दि.12 ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुक्यातील चांदसूर्या पिंप्रीपाडा या शिवारातून अमली पदार्थाची लागवड करून बेकायदेशीर शेती करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती प्राप्त झाली होती तालुक्यातील चांदसूर्या पिंपरीपाडा शिवारात वनजमिनीवर गांजा अमली पदार्थ ची लागवड करून ती विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर शेती केली जात आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने एक पथक तयार करून सोबत शासकीय पंच ,वजन काटा फोटोग्राफर यांच्यासह बातमी च्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता या कारवाईत 2 लाख वीस हजार 490 रुपये किमतीच्या 220 वीस किलो 490 ग्रॅम वजनाच्या गांझा सदृश्य अमलीपदार्थ वनस्पतीचे हिरवे ओले,ताजे झाडे यांची पाने व फांद्या व मूळ या सह प्रति किलो अंदाजित किंमत 1000 रुपये असा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरची शेती हा इसम नामे दिलीप शंभू पावरा राहणार जुनाचांदसूर्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांची असल्याचे समजले आहे .यांनी आपल्या शेतात बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य वनस्पतींच्या झाडांची लागवड करून चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केली होती त्यामुळे त्याच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि म्हणून विकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो,मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव सो,उपविभागीय पोलिस अधिकारी मा .अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील ,सपोनि चंद्रकांत पाटील पोलीस उपनिरीक्षक किरण बारे, पो.उप निरीक्षक सागर आहेर, संदीप मुरकुटे, पो. ना. ललित पाटील,पो.को. स्वप्निल बांगर ,योगेश कोळी, अमित रणमळे, प्रवीण गोसावी ,बापूजी पाटील ,एम.जी. शेख पंकज पाटील, टी.एम. गवळी इत्यादीच्या पथकाने केली आहे.
Tags
news

