शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द गावातील रहिवासी तसेच एच. आर. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील प्राचार्य आर .बी. पाटील यांच्या मातोश्री कै. चिंधाबाई भगवंतराव पाटील
यांचे वृद्धापकाळाने दिनांक 24 सप्टेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा प्रसंगी मित्रपरिवार व नातलगांनी येऊ नये. तसेच दारदर्शनाला ही कोणी येऊ नये. असा संदेश व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून अर्थे खुर्द येथील गुजर पाटील परिवाराने दिला. कृपया कोरोना काळ असल्याने नातेवाईक मित्रमंडळी यांनी गर्दी करण्याचे टाळावे.
शोकाकुल परिवाराचे हे आवाहन व घेतलेला निर्णय निश्चितच कोरोना चा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यास साहाय्यक ठरणार आहे.सध्या राज्यात, देशात, तसेच जगात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. अशा काळात शोकाकुल परिवाराने असा निर्णय घेणे खरोखर स्तुत्य व समाजाला दिशादर्शक आहे. आणि असाच आदर्श प्रत्येक समाज घटकाने घ्यावा. म्हणजे कोरोनाची साखळी आपण तोडू शकू . शासनाच्या महसूल पोलिस आणि आरोग्य विभाग कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील असताना नागरिकांकडून साहाय्य होणे अपेक्षित आहे, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अशावेळी आईच्या निधनाने दुःखद प्रसंग असतानाही शोकाकुल परिवाराने अशा प्रकारच्या निर्णय घेऊन इतर समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. समाजप्रबोधनपर संस्कार करणाऱ्या दिवंगत आदर्श मातेला निर्भीड विचार न्यूज नेटवर्क परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धाजंली .
Tags
news
