मुसळे परिवाराचा आधारवड हरपला- शोकसभेत आण्णासाहेब महाराज आहेर यांचे प्रतिपादन



                                                नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून.                                                                                                                                               नाशिक-:शहरातील सातपुर - श्रमिकनगर   सातमाऊली चौकातील कुलस्वामिनी किराणा दुकानाचे संचालक,शांत,मितभाषी, कर्तव्य तत्पर असणारे सर्वांशी मनमोकळे बोलणारे,दयाद्र अंतःकरणाचे साधुतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे वैकुठवाशी हभपश्री भिकाजीशेठ त्रंबकशेठ मुसळे सटाणेकर वय वर्षं६२ यांचे३०ऑगस्ट रोजी सात वा. हाॅस्पीटल मध्ये दुखःद निधन झाले,त्यांचे निधनाने मुसळे परिवाराचा आधारवडच हरपला असे भावोद् गार महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ नाशिकचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी  हभप भिकाजीशेठ मुसळे यांना श्रध्दांजली वाहताना व्यक्त केले,पाठीमागे पत्नी,तीन मुले महेंद्र,धनंजय,जितेंद्र व सुना नात नाती असा परिवार आहे. अजुन मनातील बरीच स्वप्ने पुर्ण करावयाची होती, किराणा माल देतांना ग्राहक हा परमेश्वर आहे व आपण त्यांचे पुजारी आहोत,भगवंताचे स्मरणात च ते आपला व्यवहार  करत असत,त्यांच्या जाण्याने सातमाऊली परिसरात पोकळी निर्माण झाली आहे,सातपुर   पंचक्रोशीतच नव्हेतर मुळगांव सटाणा येथेही त्यांचे जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे असे विचार  प्रा.श्री. गोविंद गढरी यांनीही वै. भिकाजी मुसळे यांचे निधनाबद्दल शोक प्रगट करतांना व्यक्त केले  आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने