राष्ट्राला कणखर निर्णय क्षमता असलेले पंतप्रधान : आ. काशिराम पावरा देशातल्या शेवटच्या घटकांच्या ह्लदयात स्थान निर्माण करणारा पंतप्रधान : भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी
शिरपूर : पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करत सेवा सप्ताह साजरा केला जातो आहे याच पार्श्वभूमीवर शिरपुर येथील इंदीरा गांधी मेमोरीयल हाॅस्पीटल येथील कर्मर्यांना मास्क, तर रुग्णांना श्रीफळ शिंगावे कोविड केअर सेंटर येथे फळ आ. काशिराम पावरा व भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते वाटप करण्यात आले..!!
"आपल्या राष्ट्राला कणखर निर्णयक्षमता असलेले पंतप्रधान लाभले आहेत त्यामुळे देशाचा जगभरात दरारा निर्माण झाला आहे अशा कर्तव्यदक्ष नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना मनस्वी आनंद वाटतो आहे असे आ. काशिराम पावरा म्हणाले. आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांची प्रचंड लोकप्रियता, ओतप्रोत भरलेली राष्ट्रभक्ती, गरीबांप्रती असणारी आत्मियता आणि सामान्य जनतेच्या हाल-अपेष्टांची जाणीव आणि या सगळ्या भावनेतुन देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत सामान्य व गरीब लोकांच्या ह्रदयात अढळ स्थान निर्माण करणारा राष्ट्रभक्त आज आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. नरेंद्रजी मोदींना आई भवानी भारत मातेच्या सेवेसाठी भावी पीढीसाठी उदंड निरामय आयुष्य देवो हीच प्रार्थना असे उदगार भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी व्यक्त केले. या प्रसंगी शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सदस्य देवेंद्र पाटील, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, मांडळचे माजी सरपंच भटु माळी, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, अल्प संख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, नगरसेवक देवेंद्र राजपुत, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मा. शहर सरचिटणीस सुनिल चौधरी, बुथ अध्यक्ष राजुलाल मारवाडी, रविंद्र सोनार, जगन्नाथ पाटील, रफीक तेली, अरुण पवार, विरपाल राजपुत, राज सिसोदिया, जयपाल राजपुत सह इंदीरा गांधी मेमोरीयल हाॅस्पील प्रशासकिय अधिकारी विष्णु गिरासे, डाॅ. दिनेश गुजर, कोविड केअर सेंटरचे डाॅ. भाग्यश्री गिरासे, डाॅ. रोहित सानफ, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
Tags
news
