शिरपूर -
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड व सांगवी व पळासनेर गावातील रस्त्यांची अवस्था खुपच नाजूक झालेली असून प्रशासनाने व टोल कंपनीचे तात्काळ लक्ष देऊन सदर रस्त्यांची लवकरात लवकर कार्यवाही करून वाहन चालण्यायोग्य रस्ते तयार करावा. यासंबंधीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यात सांगवी व पळासनेर गावे मोठे असून ते हायवेला लागूनच आहे.यात मध्यप्रदेश.या महामार्गाची वाहतूक खुप मोठ्या प्रमाणावर आहे.गावाच्या बसस्थानकाचा अगदी जवळ आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर रस्ता हा खुपच वाईट असून तो वाहतूक करण्यासाठी योग्य नाही.तरीदेखील सर्व वाहतूक याच रस्त्यावरून वापर होत असते.जड वाहने,बस,ट्रक,रिक्षा व अशी अनेक वाहने या रस्त्यावरून चालण्याने चालक व गावातील येणाऱ्या जाणाऱ्यासाठी हा रस्ता म्हणजे अपघाताचा केंद्रबिंदू मानला जात आहे.कारण मोठमोठे खड्ड्यातून जागाच शिल्लक राहत नसल्याने समस्या निर्माण होते. व वाहनचालकांसाठी मोठी समस्या असून चालतांना तारे वरची कसरत करावी लागत आहे.कारण सदर रस्त्यांची खुपच वाईट परिस्थिति आहे असे लोकं सांगतात .दरवर्षी रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडत पडलेली दिसून येतात व पावसाळ्यात तर जास्त पाऊस आला तर रस्त्यावर पाणी वाहते,अनेक वेळेस रस्ता नादुरुस्त अवस्थेत आढळून येतो तरी पण प्रशासन व टोल कंपनी डोळेझाक करून दुर्लक्ष का करीत आहे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला पडलेला आहे.प्रत्येक पावसाळ्यात वाहनचालकांपासून तर गावकरी,मुले यांना रस्त्यावरून चालण्यास भीतीच वाटते.सदर प्रशासन व टोल कंपनी फक्त डागडूजी करून चालले जाते म्हणून रस्त्याचे काम तात्काळ करावी अन्यथा योग्य वाहन चालण्यायोग्य तरी रस्ता दुरुस्त करावा व गावाजवळील रस्ते दुरुस्त करावे. काही अपघात झाल्यास याला कोण जबाबदार राहील.म्हणून अशा सर्व समस्यांची दखल घेत रस्त्याचे कामा बाबतीतले निवेदन मनसे रसासूअ जिल्हाध्यक्ष धीरज देसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष मा.पुनमचंद मोरे यांचा नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व पदाधिकारीकडून सदर डी.पी.टी.एल.धुळे -पळासनेर टोल लिमीटेड शिरपूर यांना निवेदन देण्यात आले.त्याबरोबरच असे सांगण्यात आले की,येत्या आठ दिवसात जर का रस्त्यांचे काम नाही झाली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असेही निवेदनाद्वारे सुचविण्यात आले आहे.याप्रसंगी मनसे रस्ता साधन सुविधा आस्थापना धुळे जि.अध्यक्ष धिरजभाऊ देसले, मनसे धुळे जि प्रवक्ता प्रदिप दहिवदकर , मनसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी , महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष छोटु राजपुत मनसे शिरपूर शहर अध्यक्ष चेतन राजपुत रस्ता साधन सुविधा अस्थापना शिरपूर ता.अध्यक्ष कवरदास पाटील,मनविसे शिरपूर ता.संघटक कैलास बाबर, मनविसे शहर अध्यक्ष सोनू राजपूत,मनविसे शहर उपाध्यक्ष राज भोई,मनसे शहर उपाध्यक्ष अतुल बडगुजर ,मनसे शहर उपाध्यक्ष घनश्याम मराठे ,मनसे शहर उपाध्यक्ष आबित कुरेशी ,तुकाराम माळचे, संजय पारधी, साहेबराव पावरा, व आदी उपस्थित होते.
Tags
news
