नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक- शहरातील वाढत्या कोरोनाबाधीतांच्या संख्येमुळे अनेक कोरोना बाधीतांना वेळेवर योग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेकडून कोरोना बाधीतांच्या नातेवाईकांसाठी संपर्क क्रमांक मनसेच्या ठक्कर बाजार येथील राजगड मनसे संपर्क कार्यालयात ०२५३-२३१७७७८ मो.+९१८१७७९४१७६० या क्रमांकावर कॉल केल्यास संबंधित परिसरातील मनसे सैनिकांचा संपर्क क्रमांक मिळणार आहे. वरील क्रमांकावर संपर्क साधल्यास मनसेकडून योग्य ती मदत केली जाणार आहे.रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोरोना बाधीतांच्या सेवेसाठी मदतीचा हात पुढे करत संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहे. असल्याचे माहिती मनसे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी दिली.
Tags
news
