राज्यातील विनानुदानीत सार्वजनिक वाचनालयांनी 'पुस्तक मागणीसाठी' अर्ज करण्याचे आवाहन -युवकमित्र परिवार' या संस्थेचा उपक्रम-




-राज्यात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परिवार,नंदूरबार या संस्थेमार्फत 'गाव तेथे ग्रंथालय'मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेतंर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत पण विनानुदानीत  सार्वजनिक वाचनालयांना मोफत पुस्तके भेट दिली जाणार आहेत. त्यासाठी उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या,धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या फक्त  विनानुदानीत सार्वजनिक वाचनालयांनी अर्ज करावेत असे आवाहन युवकमित्रचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी केले आहे.



        युवकमित्र परिवारामार्फत विविध शहरामध्ये जुने/नवे पुस्तके संकलीत केली जातात.या पुस्तकामधून वाचनीय अशी मराठी,इंग्रजी विविधांगी पुस्तके गरजू वाचनालयांना भेट दिली जातात.युवकमित्र परिवाराकडे तब्बल ५००० पेक्षा अधिक चांगल्या स्थतीतले,अवांतर वाचनाची कथासंग्रह,काव्यसंग्रह,कादंबऱ्या,,बालसाहित्य, करिअर मार्गदर्शक पुस्तके असे जुने/नवे मराठी पुस्तके उपलब्ध असून ही पुस्तके महाराष्ट्र राज्यातील  वाचनालयांना भेट दिले जाणार आहेत.खालील नमुन्यात दि.१० ऑक्टोबर २०२० अखेर yuvakmitrango@gmail.com किंवा pravinpune123@gmail.com या मेलवर ऑनलाइन अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------
*अर्जाचा नमुना*
(वाचनालयाच्या लेटरवर/साध्या कागदावर सही शिक्क्यासह)

प्रति,
मा.अध्यक्ष
युवकमित्र परिवार
पुणे/नंदूरबार

*अर्जदार-* अध्यक्ष/सचिव.(नाव,मो.क्र)........वाचनालय ....ता.....जि....

*विषय-* आपल्या विनानुदानीत सार्वजनिक वाचनालयासाठी पुस्तके मिळणेबाबत...

महोदय,
        वरील विषयान्वये विंनती अर्ज करतो की,आपल्या ...(वाचनालयाचे नाव).....वाचनालयात आज रोजी ........इतकी ग्रंथसंख्या उपलब्ध आहे. परंतु वाचनालयाला अद्याप शासनाचे कुठलेही अनुदान/मदत नसल्याने गावाच्या लोकसंख्येनुसार व वाचकसंख्येनुसार पुरेशी ग्रंथसंख्या उपलब्ध नाही.गावात फक्त आपलेच एकमेव वाचनालय असून सद्यस्थितीत वाचकसंख्या ....इतकी आहे.शिवाय वाचनालय उत्कृष्टरित्या नियमित चालू आहे.क्रुपया आपल्या वाचनालयास आपल्या चळवळीकडून मोफत ग्रंथ मिळावेत ही विंनती.
          
                 ××××
अध्यक्ष/सचिव स्वाक्षरी व शिक्का

संपर्क क्रमांक(whats up number)व नाव

(वरील पत्र टाइप करून/सुवाच्य अक्षरात लिहून त्याची पीडीएफ करावी,सोबत नोंदणी प्रमाणपत्र  स्कॅन करावे व Pdf file इमेलवर पाठवावी) कुणीही वयक्तिक कॉल करू नये ही विंनती. -----------------------------------------------
*अटी व शर्ती*
१) सदर मोहीम फक्त  विनानुदानीत वाचनालयासाठीच आहे.शासनअनुदानित वाचनालये,शाळांची ग्रंथालये,राजकीय पक्षाची वाचनालये यांनी अर्ज करू नयेत ही विंनती.
२) एका गावात एकच वाचनालय अस्तित्वात असावे शिवाय त्याची नोंदणी धमर्दाय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र नोंदणी असावी.
३)वाचनलयाकडे इमारत खोली(भाड्याची/स्वतःची),फर्निचर,कपाटे व वाचन साहित्य उपलब्ध असावे.
४)युवकमित्र परिवारामार्फत पुस्तके प्राप्त झाल्यानंतर त्या पुस्तकाची ग्रंथनोंदवहीत नोंद करणे,ग्रंथ प्राप्त झाल्याचे पत्र व ग्रंथाची यादी तत्काळ पाठवणे बंधनकारक राहील.
५)युवकमित्र कडून मिळालेले ग्रंथ/पुस्तके पुणे येथून वाचनालयापर्यन्त नेण्याची जबाबदारी स्वतः वाचनालय व्यवस्थापनाची असेल.किंवा कुरिअर पार्सल चार्जेस द्यावे लागतील.
६) वाचनालयासाठी 'ग्रंथभेट' निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य व गुणवत्ता या निकषावर आधारित असेल.
७)ग्रंथ उपलब्धतेनुसार टप्याटप्याने सर्व अर्जप्राप्त वाचनालयांना पुस्तके भेट दिले जातील.त्याकरीता वारंवार चौकशी करू नये.

    वरील अटी व शर्ती मान्य असणाऱ्या वाचनालयांनी दि.१० ऑक्टोबर २०२० अखेर yuvakmitrango@gmail.com. किंवा pravinpune@gmail.com या मेलवर अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत,:-
१)मा.सर्व पदाधिकारी राज्य/जिल्हा ग्रंथालय संघ,(सर्व जिल्हे) यांच्या माहितीसाठी
२) मा.जिल्हा ग्रंथालय अधिकारी(सर्व) यांना प्रसिद्धीसाठी रवाना

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने