शिरपूर तालुक्यात रेशनच्या काळाबाजाराला उधान, शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेने रेशनची काळाबाजारी उघड






शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार करण्यास उधाण आले असून रेशनचा काळाबाजार  करणाऱ्या प्रमुख सूत्रधार यावर नियंत्रण मिळवण्यात व कारवाई करण्यात अजूनही पुरवठा विभागाला अपयशच आले आहे .मागील काही काळात धुळे जिल्ह्यातील काही  रेशन दुकानदारांवर निलंबनाची व दंडात्मक कारवाई करण्यात आली असली तरी रेशन विभागातील दलाल आणि तालुक्यातील रेशन तस्कर या नावाने ओळखले जाणारे डॉन आजही सक्रिय असून रेशन मालाची मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्या बाबत बोलले जात आहे. लॉक डॉऊन काळात सरकारने अन्नधान्याची भांडारे उघडी केली गरिबांना मदत करण्यासाठी मोफत रेशन ची योजना आणली या काळात  थंब सिस्टीम बंद होती व काही काळ ऑफलाईन कामकाज सुरू होते. याचाच फायदा घेत रेशन तस्करांचे फावले  आणि रेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करण्यास त्यांना वाव मिळाला. यापूर्वी रेशन माल तालुक्यातच विकला जात होता आता मात्र रेशन मालाची काळाबाजार करून हा माल मध्य प्रदेशा पर्यंत जाऊन विकला जात असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
      - असाच एक प्रकार शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे समोर आला असून वाहनातून रेशन चा तांदूळ व धान्य खाजगी दुकानात उतरवत असताना शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा दाखल करून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे त्यामुळे हा माल नेमका कोणाच्या त्याच्या बोलवता धनी कोण इत्यादी गोष्टींचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे काल दि.11 रोजी भरदुपारी शिरपूर शहरात पोलिसांनी शहरातील मेन रोडवर पाच कंदील च्या भागात कारवाई करण्यास गेले असता तेथे ट्रक क्रमांक एम एच 18- aa- 15 48 यात सरकारी शिक्का मारलेल्या गोण्या मधून माल बदलून गहू व तांदूळ ची तस्करी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी गहूच्या 56 गोण्या व तांदुळाच्या 16 गोण्या या सह वाहन जप्त केले आहेत या कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच काही संशयित फरार झाले तर इमरान मोहम्मद तेली  वय 32 ,फिरोज मोहम्मद तेली वय 37 राहणार सरस्वती कॉलनी शिरपूर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दोघांकडेही स्वस्त धान्य दुकानाच्या परवाना नसल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या कारवाईमुळे रेशनचे तस्करी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून हा माल सरकारच्या कोणत्या गोडाऊन मधून भरून कोणत्या दुकानाच्या नावाने बाहेर आला होता आणि तो काळ्याबाजारात नेमका कसा पोहोचला यामागे नेमके सूत्रधार कोण किंवा या मालाच्या मागे शिरपूर तालुक्यातील तथाकथित रेशन डॉन याचाही काही हात आहे का ?याचा शोध घेणे महत्वाचे ठरणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने