लता मंगेशकरांनी वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली....




 
मुंबई -प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या बालसुब्रमण्यम यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे श्रोत्यांसह कलाविश्वातील प्रत्येक सेलिब्रिटीला धक्का बसला आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली असून लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनीही बालसुब्रमण्यम यांना आदरांजली अर्पण केली आहे. 
“प्रतिभावंत गायक, मधुरभाषी आणि एक उत्तम व्यक्ती एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार अस्वस्थ वाटत आहे. आम्ही दोघांनी एकत्र अनेक गाणी गायली, गाण्याचे अनेक शो केले. आज ते सगळं आठवतंय.त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने