नाशिक शहरात शैक्षणिक संस्था कडून शुल्क वसुलीसाठी सक्ती ,व मुजोरी






इंदिरानगर वार्ताहार :नाशिक शहरातील काही शैक्षणिक संस्था या पालकांना शुल्क वसुलीसाठी त्रास देत आहेत शहरातील मुजोर शिक्षण संस्थांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना विभाग प्रमुख निलेश साळुंखे यांच्यासह नाशिकच्या पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
नाशिक शहरातील काही शैक्षणिक संस्थांचे संचालक व व्यवस्थापक यांच्याकडून शासनाने नेमून दिलेल्या अटी व शर्ती चे पालन न करता मनमानी पद्धतीने पालकांकडून फी वसुलीसाठी तगादा लावत आहेत कोरोना काळातही या संस्थांची मुजोरी वाढली असून त्याचा प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास विद्यार्थ्यांसह पालकांना सोसावा लागत आहे
या शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक मनपा प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई करण्यात येत नाही अशा मुजोर शैक्षणिक संस्था विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न करून सुद्धा पोलीस विभाग तक्रारी घेत नाही या तक्रारींचा तात्काळ दखल घेऊन या शिक्षण माफियांच्या विरोधात कारवाई सुरू करावी व मनमानी कारभार करणाऱ्या संस्था चालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत
अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी शिवसेना विभाग प्रमुख निलेश साळुंखे, सुरेश पाटील, प्रदीप यादव ,योगेश पालवे, हरिष वाघ, संतोष कदम ,यांच्यासह पालक आदी हजर होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने