विजय केदारे व आहेर यांचा कोविंड योद्धा म्हणून सन्मान



नाधिक - राष्ट्रीय लोकशाही पत्रकार संघाचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष विजय केदारे व राष्ट्रीय पत्रकार संघाचे जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब आहेर यांचा नारायणगाव खेरवाडी येथील सह्याद्री स्वराज्य सामाजिक संस्था व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष सुभाष आवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविंड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर व जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ शिरसाट व पंचायत समिती सदस्य रत्नाताई संगमनेरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या वेळी  प्रतिष्ठित नागरिक तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदि सह उपस्थित होते.
स्वराज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आवारे याच्यां सहकार्याने सदर नियोजित कार्यक्रम यशस्वी झाला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने