श्रीगणेश विसर्जनासाठी,"विसर्जन आपल्या दारी", या संकल्पनेतून पर्यावरण पूरक रथ





नाशिक - इंदिरानगर वार्ताहर :श्रीगणेश विसर्जनासाठी,"विसर्जन आपल्या दारी", या संकल्पनेतून भा.ज.पा. प्रणित "श्री प्रतिष्ठान" तर्फे पर्यावरणपूरक असे 4 फिरते  विसर्जन रथ बनविण्यात आले होते,
 आमदार प्रा.देवयाननी फरांदे यांनी श्रीफळ वाढवून  श्री प्रतिष्ठान चे मानाच्या गणपतीचे विसर्जन फिरत्या रथामध्ये करून सुरुवात केली, यावेळी सभागृहनेते सतिश सोनवणे, इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर ,  सुनील बच्छाव सुनिल देसाई व श्री प्रतिष्ठान चे सर्व सदस्य, व नागरिक उपस्थित होते.*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी,प्रभाग क्रं. 30 मधील इंदिरानगर व आजूबाजूच्या परिसरात  नागरिकांना घरच्या व सोसायटीच्या गणपतीचे घरीच त्यांच्या दारासमोर विसर्जन करता यावे म्हणून, भारतीय जनता पार्टी प्रणित 'श्री प्रतिष्ठान' नगरसेवक अँड.श्याम बडोदे यांच्या संकल्पनेतून 4 फिरते रथ परिसरातील वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाऊन सार्वजनिक व घरघुती एकूण 2713 मूर्त्यांचे संकलन करून नागरिकांच्या हस्तेच रथामधील पाण्याच्या कुंडामध्ये विधिवत विसर्जन करण्यात आले.
हा उपक्रम कलानगर, पांडव नगरी ,चार्वाक चौक, राजीवनगर ,सदिच्छा नगर, वडाळा पाथर्डी रस्ता ,चेतना नगर, सराफ नगर ,श्रद्धा विहार ,डेकेअर शाळा परिसर , वडाळा गाव शंभर फुटी रस्ता ,आदी ठिकाणी राबविण्यात आला विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून चार फिरत्या वाहनांवर हौदाची व्यवस्था करण्यात आली होती निर्माल्य साठविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती तसेच मूर्तीदान करायची व्यवस्थाही करण्यात आली होती मंडळाच्या सदस्य तर्फे सोशल डेस्टिगचे पालन करून जमा केलेल्या मूर्ती महापालिकेच्या संकलन केंद्रात पोहोचण्यात आल्या तसेच निर्माल्याची ठरवून दिलेल्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली यावेळी श्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के ,भरत शिरसाट ,योगेश रेवगडे, आशिष दाभोळकर ,गोपाळ आव्हाड ,राम बडोदे, मनीष पाटील ,सतीश यादव ,किरण पाटील ,प्रशांत पाटील, गणेश रत्नपारखी, परेश पाटील, आदिल शेख, मनोज वायल, राम नागरे ,नितीन बाडे ,आदींनी परिश्रम घेतले


प्रतिक्रिया 
नागरिकांच्या सुरक्षतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी या उपक्रमाला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला यावेळी एकूण 27 13 मूर्ती संकलन करण्यात आल्या
अँड शाम बडोदे नगरसेवक प्रभाग क्रमांक तीस

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने